माजी खासदार
पनवेल तालुक्यातील न्हावा खाडी या छोट्याशा गावात जन्मलेले रामशेठ ठाकूर यांनी खाडीतील रेती काढण्यापासून आयुष्याची सुरुवात केली. रयत शिक्षण संस्थेत शिकून ते शिक्षक झाले, पुढे यशस्वी उद्योजक आणि दोन वेळा रायगडचे खासदार झाले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांनी शाळा, महाविद्यालये आणि समाजोपयोगी उपक्रमांतून मिळालेले सर्व समाजाला परत दिले. म्हणूनच जनतेने त्यांना ‘लोकनेते’ म्हणून गौरविले.
न्हावा खाडी येथे जन्म
सातारा येथून बी.ए.; पुढे शिक्षक
बांधकाम व्यवसायाची सुरुवात
गव्हाण येथे संस्थेची पहिली शाळा
कुलाबा मतदारसंघातून खासदार
न्हावा खाडीत ‘रामबाग’ उद्यानाचे लोकार्पण
दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना वह्या, गणवेश व शैक्षणिक मदत.
मोफत आरोग्य तपासणी आणि औषधांचे वाटप.
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आणि पनवेल-खारघर मॅरेथॉन.
अटल करंडक एकांकिका स्पर्धा, नाट्य व आगरी-कोळी महोत्सव.
मला परमेश्वर देत गेला. जे मिळाले ते माझे नाही, त्या परमेश्वराचे आहे; ते मी त्याला अनेक रूपांनी परत करतो आहे.— लोकनेते रामशेठ ठाकूर