माजी खासदार
खासदार म्हणून (१९९८–२००४) रामशेठ ठाकूर यांनी रायगडच्या जनतेचे प्रश्न लोकसभेत सातत्याने मांडले. त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न व भाषणे.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी किंवा रोजगार देण्याची मागणी लोकसभेत केली.
जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवरील चर्चेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर भाषण केले.
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत लोकसभेत तारांकित प्रश्न (क्र. ३७९) विचारला.
रायगडसह ग्रामीण भागात सिलेंडर घरपोच मिळत नसल्याबद्दल तारांकित प्रश्न विचारला.
प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के जमीन देण्याबाबत तारांकित प्रश्न विचारला; सरकारने त्यावर उत्तर दिले.
सेझमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाबद्दल लोकसभेत प्रश्न विचारून सरकारला जाब विचारला.